
शेतीच्या नवीन 3 कायद्या विरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन योग्य की अयोग्य ?
असा प्रश्न मागील काही दिवसांपासून पुष्कळ सामान्य आणि बुद्धिजीवी लोकांना पडला आहे माझी सुद्धा माझ्या काही मित्रांसोबत किंवा सोबतच्या लोकांसोबत राजकीय मंडळी सोबत या विषया वर पुष्कळ दा पर्सनल डिबेट होत राहते
खरे पाहता शेतकरी खूप दिवसांनी कोण्या गोष्टीसाठी एकत्र आला आहे हेच खूप मोठी गोस्ट आहे यात मला पुष्कळ आनंद आहे
आणि आता प्रश्न पडला की हेच सरकार शेतकरी विरोधी पॉलीसी बनवत आहे काय तर याचे उत्तर नाही अशे आहे, सरकार कोणतीही असो वारंवार शेतकरी विरोधी पॉलीची राभवात असल्या मुळे हे सगळे होत आहे आणि सरकार विषयी शेतकऱ्यानं मध्ये अविश्वासाचा भावना या मुळे वाढत आहे
एकीकडे सरकार 6 पे कमिशन 7 पे कमिशन लावून सरकारी कर्मचारी यांचे पगार वाढवत आहे पण स्वामिनाथन आयोग शेकऱ्यांकरिता जो सद्या आवश्यक असणारा कायदा लागू करत नाही आहे ज्या मुळे समाजात सुद्धा एक आर्थिक विषमता निर्माण होत आहे
मग कोणतेही सरकार असो कित्तेक वर्षांपासून स्वामिनाथन आयोग लावण्यास टाळाटाळ करत आहे आणि त्या बदल्यात जे शेतकऱ्यांनी कधी मगितलेच नाही ते शेतकऱ्यांन वर थोपवात आहे
———————————————-
आता सद्याच्या विषयावर शेती संदर्भातील 3 नवीन कायदे
शेती संबंधित सद्याच्या केंद्रीय सरकार ने केलेले 3 नवीन कायदे हे फक्त शेतकऱ्यांच्या विरोधात च आहे अशे नाही तर याची सगळ्यात मोठी मार ही APMC लाच बसेल हे सत्य आहे आज मी पूर्ण विश्वासा ने सगळ्यांना सांगू इच्छितो की फक्त शेतकर्यांनीच नाही तर APMC मध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी , अडत्यानी , छोट्या मोट्या व्यापाऱ्यांनी सुद्धा याचा मोठा विरोध करणे आवश्यक आहे नाहीतर भविष्यात आपल्या APMC चे हाल सरकारी BSNL कंपनीचे जशे झाले तशेच होईल , तिथेही सरकारने BSNL जी एके काळी टेलिकॉम मधली सगळ्यात जास्त प्रोफिटेबल कंपनी होती ती reliance jio च्या फायद्यासाठी दिवलीया करून टाकली तशेच हाल APMC चे व्हायला टाइम लागणार नाही . जशे कोणी आज BSNL चे सिम कार्ड घेत नाही तशे उद्याला APMC मध्ये माल आणणे बंद होईल , APMC चा सगळा कारभार शेज मधून चालतो मग माल च शेतकऱ्याने आणणे बंद केले तर शेज कुठला आणि कॉट्रॅक्ट फार्मिंग मध्ये पाहिले 2 – 3 वर्ष जर खाजगी कंपनीने शेती माला ला जास्त भाव दिला तर APMC मध्ये शेतकऱ्याचा माल येणे बंद होईल , त्यामुळे APMC डबघाईस येईल किंवा बंद पडल्यात जमा होईल आणि 3 वर्षा नंतर खाजगी कंपनीने माल MSP पेक्षाकमी भावात घेतला काय किंवा जास्त भावात घेतला काय शेतकऱ्यांना यांनाच माल देन्या वेतिरिक्त पर्यायच राहणार नाही , कारण MSP वर अजून कणखर अशे या कायद्यात काहीच नाही आहे आणि तोपर्यंत शेती मार्केट मध्ये खाजगी कंपनीची मोनोपॉली सुरू होऊन जाईल , आज जरी याचा असर दिसत जरी नसला तरी भविष्यात याचा असर फक्त शेतकरीच नाही तर सामान्य नागरिकांना सुद्धा दिसायला सुरू होईल तेव्हा आपण सगळे हतबल होऊन पाहत राहण्या वेतिरिक्त काहीच करू शकणार नाही , जशे हाल BSNL चे झाले तशेच हाल APMC चे होईल,मी हे सगळे फक्त शेतकरी म्हणून नाही तर माझे शिक्षण आणि कॉर्पोरेट अनुभवा मधून सांगत आहे त्यामुळे ,
” SUPPORT FARMER TODAY TO SAVE YOUR FUTURE ”
….. पराग राऊत पाटील

