महाराष्ट्रातून राज्यसभेत एकूण 6 खाजदार जाणार आहे,

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजी राजे यांनी अपक्ष उमेदवार जाहीर केलेली आहे अशा परिस्तितीत त्यांना सगळ्या राजकीय पक्षाने बिनशर्त पाठिंबा जाहीर करायला पाहिजे होता , हीच ती वेळ होती की राजकीय पक्षांनी छत्रपती घराण्याचे थोडे पांग फेडण्याची , पण हे सोडून राज्यांना अटी शर्ती मध्ये अटकवणे ,म्हणजे ज्यांच्या नावाने महाराष्ट्रातील सगळेच राजकीय पक्ष राजकारण करतात त्यांनाच इंनडायरेक्ट वे ने तडजोड करून त्यांची कोंडी करून स्वतःची पोळी भाजून घेण्यासारखे आहे आणि या प्रकरणात संभाजी राजांची कोंडी करणे खरच चुकीचे आहे , ही तर खरंच महाराष्ट्रा साठी लाजिरवाणी गोष्ट आहे .
ज्यांच्या पूर्वजांन मुळे हा महाराष्ट्र घडला 18पगड जातींना ज्यांनी एकत्र आनले त्यांनाच जर ह्या महारास्ट्रात राजकीय स्थान द्यायला हे राजकारणी मागे पुढे पाहत असतील तर याच्या सारखा महाराष्ट्राचा दुसरा कोनताच अपमान नाही.
मला तर अशे वाटते की ही तर सर्वपक्षीय साजीश आहे कारण भविष्यात जर छत्रपती राजघराण्यातील एक हुशार आणि इमानदार व प्रतिभावंत माणसाने जर पुढाकार घेतला तर महाराष्ट्रात एक मोठे नेतृत्व तयार होईल जे सगळ्यांना भारी पडेल या गोष्टी जाणीव महाराष्ट्रातील सगळ्याच राजकीय पक्षांना आहे आणि त्यांच्या नेत्यांना सुद्धा आहे त्या मुळेच संभाजी राज्यांच्या प्रतिभेला भेऊनच हे छल कपट चे राजकारण सुरू केल्या गेले अशी आशंका वाटते आणि त्या मुळेच हे सगळे पाऊले उचलल्या जात आहे अशी शंका महाराष्ट्रातील सगळ्या जनतेमध्ये फोफावत आहे बाकी सगळे ठीक आहे पण निदान या राजकीय लोकांनी राज्यांन सोबत तरी अशे विचित्र राजकारण करू नये ही महाराष्ट्रातील तमाम जनते कडून या राजकीय लोकांना व राजकीय पक्षांना हातजोडून विनंती.
पराग राऊत पाटील

