GovernencePoliticsSocialSpecialState

हिंदू हृदय सम्राट मा बालासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा सिमेंट काँक्रिट चा बनविणे भविष्यात एक मोठा चुकीचा निर्णय ठरेल काय ?

होय आज कदाचित तुम्हाला हास्यास्पद वाटेल की इतका चांगला समृद्धी सुपरफास्ट एक्सप्रेसवे बनविल्या नंतर त्याला अशे नाव बोट ठेवणे म्हणजे स्वतःच्या अकलेचे तारे तोडन्या सारखे आपल्याला वाटेल पण मी ही गोस्ट स्वतःच्या अनुभवातून आणि विदर्भात असलेल्या नैसर्गिक परिस्तितीला अनुसरून सांगतो की हा रोड सिमेंट काँक्रिट चा बनविणे म्हणजे अकॅसिडेंट ला आमंत्रण देने आहे,समृद्धी रोड वर उन्हाळ्यात अकॅसिडेंट हे जास्तीत जास्त टायर फुटी मुळे होण्याचे प्रमाण वाढेल ,

उन्हाळ्यात विदर्भातील तापमान हे 45 डिग्री चा पार होते आणि त्या मध्ये सिमेंट काँक्रिट च्या रोड वर गाडीचे टायर फुटण्याचे चांचेस खूप जास्त आहे आणि हे मुख्य कारण रोड बनविणाऱ्या विभागाला कशे काय लक्षात आले नाही याचेच आष्यर्य वाटत आहे.

प्रत्येक वाहन धारक टायर मध्ये नायट्रोजन हवा भरेलच अशे नाही आणि इतक्या लांब पल्ल्या चा रोड काँक्रिटचा असल्या कारणाने टायर गरम होऊन आणि गरम तापमानाने टायर फुटू शकतो. काही छोट्या मोट्या चुका या रोड बांधकामा मध्ये झाल्या आहे त्यातील ही एक मोठी चूक ठरेल असे सध्याच्या परिस्तिथी नुसार वाटत आहे.

टायर मध्ये नायट्रोजन हवा भरण्या करीता ठीक ठिकाणी उन्हाळा लागण्याआधीच याची उपलभता संबंधित विभागाने कराव्यात हे काम फास्ट करणे अति आवश्यक आहे.

गाडी चालवताना सुद्धा सिमेंट कॉक्रिट रोड मुळे स्मूथ नेस जाणवत नाही गाडीचा noice येतो आणि गाडी पाहिजे तशी ग्रीप घेत नाही हे आपल्याला सुद्धा गाडी चालवताना जाणवेलच.

प्रत्येका कडे पूर्ण फॅसिलिटी असणारे वाहन असेलच अशे नाही अव्हरेज गाडी असणाऱ्यांनी अजून जास्त काळजीने वाहन चालविणे फार आवश्यक आहे .

त्याउलट डांबरी रोड वर गाडीला ग्रीप राहते आणि गाडी मध्ये स्मूथ नेस जाणवते आणि टायर सुद्धा कमी गरम येतो परिणामी अकॅसिडेंट चे प्रमाण सुद्धा कमी.

आज इतकी Technology develop झाली असतानाही अशे रोड हे भविष्यात घातक ठरू शकतात कारण इतक्या लांब पल्या च्या रोड मध्ये लोकांच्या गाड्या सुद्धा फार फास्ट धावन्याचे प्रमाण वाढेल .

या सगळ्या गोष्टींचा विचार करता राज्य सरकार व केंद्र सरकारने या वर काही उपाय योजना करण्याची विनंती मी या पोस्ट द्वारे करत आहे,

हो कदाचित माझे knowledge या क्षेत्रा मध्ये कमी असेल पण तरी हे माझे वयक्तिक मत मी प्रगट करत आहे .

भविष्यात या सिमेंट काँक्रिट रोड वर डांबर रोड ची लेयर टाकून सुद्धा या प्रॉब्लेम वर सोल्युशन निघू शकते किंवा आजकाल जगात या प्रॉब्लेम वर पुष्कळ सोल्युशन निघाले आहे आणि नवीन Technology वापर करून सहजच या वर सोल्युशन मिळेल.

मी ही पोस्ट लिहण्याचा एकच उद्देश आहे की भविष्यात कोण्या कुटुंबातील एका सुद्धा वेक्ति चा या कारणांनी अकॅसिडेंट होऊ नये .

पुष्कळ लेट होण्या आधीच सरकार ने या वर उपाय योजना कराव्यात आणि लोकांचा प्रवास अधिक सुखमय व सुरक्षित करावा ही विनंती. 

आपला

               पराग राऊत पाटील

पराग राऊत पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close